Kalyan Accident Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Accident : दुचाकीवरून तोल जाऊन पडला; एसटीच्या चाकाखाली आल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

Kalyan News : राज्य परिवहन महामंडळाची हि बस बोरीवलीहून कल्याण बिर्ला कॉलेजमार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. याच वेळी अमनकुमार हा समोरून महाविद्यालयात जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: महाविद्यालयीन तरुण दुचाकीने जात असताना समोरून आलेल्या महामंडळाच्या बसच्या बाजूने जाताना त्याचा तोल गेला. यामुळे तो रस्त्यावर पडला आणि थेट बसच्या मागील चाकाखाली सापडला. यात त्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कल्याण बिर्ला कॉलेज रोडवर सकाळच्या सुमारास घडली आहे. हा अपघात पाहून काहीजणांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. 

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. अमनकुमार दुबे (वय १७) असे सदर घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाची हि बस बोरीवलीहून कल्याण बिर्ला कॉलेजमार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. याच वेळी अमनकुमार हा समोरून महाविद्यालयात जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

तोल जाताच बसच्या चाकाखाली सापडला 

समोरून येत असलेल्या बसच्या बाजूने निघण्याच्या प्रयत्न करत असताना दुचाकीस्वार अमनकुमार याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि थेट एसटी बसच्या मागील चाकाखाली सापडला. बोरीवलीहून पुण्याकडे जाणाऱ्या बस चालकाला काही समजण्याच्या आतच बसचे चाक अमनकुमार याच्या अंगावरून गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. 

बस चालक ताब्यात 

अपघाताची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करत एसटी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच बस देखील जमा करण्यात आली आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. तसेच अपघातामुळे मार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT