Kalyan Bike Accident News Saam TV
महाराष्ट्र

Kalyan Accident News: खड्डा चुकवताना बाईकवरून तोल गेला, नेमका त्याचवेळी डंपर आला; तरुणाचा जागीच मृत्यू

Kalyan Bike Accident News: रस्त्यावरील खड्डा चुकवताना तोल जाऊन डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Kalyan Bike Accident News: रस्त्यावरील खड्डा चुकवताना तोल जाऊन डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण मलंग रोड द्वारली परिसरात गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. सूरज गवारी असे मृत तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्व चिंचपाडा रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सततच्या पावसामुळे कल्याण मलंग रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना अनेकदा या रोडवर छोटे-मोठे अपघात देखील होत आहेत. त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्ता सुस्थितीत करा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहेत.

मात्र, महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचा काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सूरज गवारी हा तरुण दुचाकीस्वार याच रस्त्यावरून जात होता. दरम्यान, खड्डे चुकवत असताना सूरजचा तोल गेला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरने त्याला चिरडलं.

दरम्यान, खड्डे चुकवत असताना या तरुणाचा तोल जाऊन तो डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी पोलीस पाटील चेतन पाटील यांनी केला आहे. एकीकडे, महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला जात आहे.

खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली होती. खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठले असताना देखील खड्डे बुजवण्याचं काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT