jyoti mete, vinayak mete, beed saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete Case : व्हायरल ऑडिओ क्लिपवर विनायक मेटेंच्या पत्नी भावूक, म्हणाल्या... (व्हिडिओ पाहा)

अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझा देखील बोलणं झाला आहे.

विनोद जिरे

Jyoti Vinayak Mete : अण्णासाहेब मायकर यांच्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी शाेध घेत सखाेल चाैकशी करुन आमच्या कुटुंबास आणि साहेबांच्या कार्यकर्त्यांपर्यंत सत्य समाेर आणावे असे मत ज्याेती विनायक मेटे यांनी आज (मंगळवार) येथे (beed) साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अपघात झाला की घातपात अशी शंका व्यक्त हाेऊ लागली आहे. त्यावर मेटे यांच्या पत्नी ज्याेती यांनी कार्यकर्त्यांच्या संवादावरुन संबंधित गाेष्टीची पडताळणी केली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. (Vianayak Mete Latest Marathi News)

विनायक मेटे यांच्या अपघाता संदर्भातील कॉल रेकॉर्डींग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विचारले असता ही क्लिप मी आत्ताच ऐकलेली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझा देखील बोलणं झाला आहे. त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे असे म्हटलं आहे.

तीन ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचे देखील अण्णासाहेब यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे. अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी याची देखील चौकशी झाली पाहिजे. संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे असेही ज्योती मेटे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT