Satara: बालसुधारगृहात अल्पवयीन संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या! ओंकार कदम
महाराष्ट्र

Satara: बालसुधारगृहात अल्पवयीन संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या!

वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन संशयित गेली काही दिवस सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आला होता.

ओंकार कदम

ओंकार कदम

सातारा : वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन संशयित गेली काही दिवस सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आला होता. त्याने आज सकाळी बालसुधारगृहामध्ये Juvenile Correctional Institution आत्महत्या Suicide केल्याची घटना घडली आहे.

हे देखील पहा-

याची माहिती मृताच्या नातेवाइकांना समजताच नातेवाईकांनी बालसुधारगृहा बाहेर गोंधळ केला. यानंतर सातारा शहर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

खटाव Khatav तालुक्यातील एका गावात राहणार्‍या अल्पवयीन तरूणावर त्याच्याच नात्यातल्या युवतीवर अत्याचार Harassment केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन असल्याने त्याला सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान त्याने आज शनिवारी सकाळी बालसुधारगृहातच बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच संबंधित युवकाच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT