Junnar News Saam tv
महाराष्ट्र

Junnar News: शिक्षकाकडून गतिमंद विद्यार्थ्यांला जबर मारहाण; पोलिसात गुन्‍हा दाखल

शिक्षकाकडून गतिमंद विद्यार्थ्यांला जबर मारहाण; पोलिसात गुन्‍हा दाखल

रोहिदास गाडगे

जुन्‍नर : जुन्नर तालुक्यातील धामनखेल येथील विशेष मुलांची माय ऍक्टिव्हिटी नंदनवन शाळा आहे. या शाळेचे (Teacher) शिक्षक विकास बाजीराव घोगरे व कर्मचारी सुभाष दिलीप ठोकळ यांनी गतिमंद व अपंग असलेल्या माधव शिंदे या विद्यार्थ्यांला जबर मारहाण केल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांमध्ये गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

माय ऍक्टिव्हिटी नंदनवन या शाळेत नुकताच माधव शिंदे या विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला होता. मात्र या विशेष मुलाला जबर मारहाण केली गेली असून त्यात त्याच्या हाडांची मोडतोड झाली आहे. शाळेतील लोखंडी पाईपने डाव्या हाताच्या खांद्यावर, सीटवर तसेच उजव्या पायाच्या घोट्यावर मारहाण केली आहे. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

खासगी रूग्‍णालयात उपचार सुरू

मुलाच्या डाव्या हातावर जखमांचे व्रण आहेत. हा विद्यार्थी सध्या जुन्नर येथील मॅक्स केअर सिटी हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचार घेत असून आरोपी शिक्षक व कर्मचारी दोघे अटकेत आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT