Junnar News Saam tv
महाराष्ट्र

Junnar News: पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी; पती– पत्नी दोघांचाही बुडून मृत्यू

पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी; पती– पत्नी दोघांचाही बुडून मृत्यू

रोहिदास गाडगे

जुन्‍नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कुकडेश्वर (Junnar) येथे घराजवळील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या पत्नीला विहिरीतून वाचविताना पती– पत्नी दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सहा महिन्यांपूर्वीच या दोघांचे (Marriage) लग्न झाले होते. (Breaking Marathi News)

सागर बाळू दिवटे व नाजूका सागर दिवटे या अपघातात मृत (Death) झाले आहेत. कुकडेश्वर येथील विहिरीवर घरातील कपडे अंथरुण व कपडे धुण्यासाठी दिवटे कुटुंबातील नवविवाहित महिला गेली होती. यावेळी विहिरीच्या कडेवर पाण्याने ओलसर भाग झाल्याने कपडे धुताना तिचा पाय घसरुन विहिरीत पडली. यावेळी वाचविण्यासाठी नाजिका दिवटे यांनी आरडा ओरड केली.

मोबाईलवर सुरू होते गाणे

पत्‍नीचा आवाज आल्‍याने पती सागर धावत येऊन पत्नी नाजुकाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र पोहण्याचा सराव नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडुन दुदैवी मृत्यु झाला. विहिरीच्या काठावर गाणे सुरू असलेला मोबाइल व विहिरीत तरंगणारी बादली दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणहून जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत

गावरान स्टाईलमध्ये बनवा हिरव्या माठाची भाजी, रेसिपी आहे एकदम सोपी

Health Care: वजन कमी करायचंय? मग रोज संध्याकाळी ७ वाजता जेवण्याची सवय लावा; मिळतील 'हे' फायदे

Parenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात? स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

धक्कादायक पण दुर्मिळ घटना! जन्मत: दात असलेलं 1 किलोचं बाळ! मुंबईत डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT