Marriage Junnar News Saam tv
महाराष्ट्र

Marriage Royal Entry In JCB: नवरदेव-नवरीची अशी वरात कधीच पाहिली नसेल... थेट जेसीबीच्या बकेटमधूनच रॉयल एन्ट्री

वधू– वराची जेसीबीच्या बकेटमधुन हटकेबाज मिरवणूक

रोहिदास गाडगे

Junnar News: लग्न म्हटलं की काहीतरी आगळंवेगळं आणि हटकेबाज करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. कधी वधू मुलगी थेट बुलेटवर येते, तर कधी वधु– वर मंडपात चारचाकी घेवून येतात. असाच हटके प्रकार जुन्‍नर (junnar) तालुक्‍यात झालेल्‍या विवाह (Marriage) सोहळ्यात पहावयास मिळाला. नववधू– वरच्‍या लग्नाची वरात चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून निघाली. (Tajya Batmya)

निवडणुक जिंकल्यावर जेसीबीमधून गुलाल किंवा भंडारा उधळ्याचे आपण पाहिले असेल मात्र आपल्या मुलाच्या लग्नाची वरात एका जेसीबी चालकाने कारमधून नव्हे; तर चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून काढली. लग्‍नाच्‍या वरातीत काही तरी वेगळे करायचे; हा प्रत्‍येकाचा प्रयत्‍न असतो. यातून झालेल्‍या या हटकेबाज वरातीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

अन्‌ जेसीबीच्‍या बकेटला केली सजावट

जुन्नर तालुक्यातील खोडद येथील महेश गायकवाड यांच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. गायकवाड यांनी नवरदेव- नवरीला जेसीबीच्या बकेटमध्ये बसविले. या बकेटला चांगले डेकोरेशन करून लग्नाची वरात काढल्याने या लग्नात जेसीबीचीचं मोठी चर्चा रंगली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News : मान्सून गोव्यात दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज आला समोर

Pune Crime: पुण्यात रक्तरंजित थरार! विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची हत्या, झोपेत असताना चाकूने सपासप वार करत संपवलं

एकही पिंपल दिसणार नाही! चमकदार त्वचेसाठी आजच बदला 'या' ५ वाईट सवयी

Lifestyle habits: महिलांनो...तुम्हाला या ५ सवयी असतील तर अकाली दिसू शकता वृद्ध!

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत

SCROLL FOR NEXT