St Bus Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: एसटी उत्‍पन्‍नात १५ पटीने वाढ; प्रवाशी संख्‍याही वाढली

एसटी उत्‍पन्‍नात १५ पटीने वाढ; प्रवाशी संख्‍याही वाढली

संजय महाजन

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महांडळाच्‍या उत्‍पन्‍नावर मोठा फटका बसला होता. या संप काळात जळगाव विभागातून दररोज ३ ते ५ लाखांपर्यंत येत होते. मात्र, आता संप मिटल्यानंतर उत्पन्नात (Jalgaon News) पंधरा पटीने वाढ होवून ७५ लाखांपर्यंत पोहोचले आहे. (jjalgaon news increase in ST revenue The number of passengers also increased)

राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी साडेपाच महिने संपावर राहिले. या काळात महामंडळ डबघाईला गेले होते. मात्र आता लालपरीचे (St Bus) चाके रूळावर आल्‍याने महामंडळाच्‍या उत्‍पन्‍नात देखील चांगली वाढ झाली आहे. सर्व कर्मचारी कामावर आल्यामुळे महामंडळातर्फे दररोज सव्वादोन लाख किलो मीटरचे अंतर कापले जात आहे. यातून सव्वा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.

जवळपास सर्व मार्गावर बस

जिल्हाभरातील सर्व आगार मिळून ३ ते ५ लाखांपर्यंतउत्पन्न येत होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर परतल्याने महामंडळाची बससेवा पूर्ववत झाली आहे. तीन दिवसांपासून संप काळात ३ ते ५ लाखांच्या घरात येणाऱ्या उत्पन्नात दहापंधरा पटीने वाढ होऊन ७५ लाखांच्या घरात उत्पन्न येत असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले. सर्व मार्गांवर बसेस सुरू झाल्यामुळे प्रवाशांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT