Beed: जिनिंगमधील मुख्य तिजोरी फोडून 48 लाख चोरले; गुन्हा दाखल Saam TV
महाराष्ट्र

Beed: जिनिंगमधील मुख्य तिजोरी फोडून 48 लाख चोरले; गुन्हा दाखल

सदर रक्कम मधुन काही रक्कम कॅशीयर साळुंके यांनी त्याच दिवशी शेतकऱ्यांना (Farmer) वाटप केली होती.

विनोद जिरे

बीड : जिनिंगमधील मुख्य तिजोरी फोडून 48 लाखांवर, अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना बीडच्या परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथील पोर्णीमा काँटन जिनिंग अन्ड प्रेसिंग फॅक्टरी येथे घडली आहे, तर या घटनेने बीड जिल्ह्यात (Beed District) मोठी खळबळ उडाली आहे. ओंकार उत्तमराव खुर्पे यांच्या मालकीची परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथे पोर्णीमा काँटन जिनिंग अँन्ड प्रेसिंग फॅक्टरी आहे. दोन दिवस सलग बँकेला सुट्टी असल्याने, कापूस खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरीचे कॅशीअर अशोक भिमराव साळुंके व त्यांचे सोबत निलेश विलासराव देशमुख यांनी परळी येथे जाउन 24 डिसेंबर रोजी चेक क्र . 273335 ने 50 लाख काढून आणले होते.

सदर रक्कम मधुन काही रक्कम कॅशीयर साळुंके यांनी त्याच दिवशी शेतकऱ्यांना (Farmer) वाटप केली होती. तर रात्रीला हिशोब करुन शिल्लक रक्कम 47 लाख 78 हजार 400 पैकी 45 लाख रु. हे मुख्य लोखंडी तिजोरीत लॉक करुन ठेवले होते. उर्वरित 2 लाख 78 हजार 400 रु. समोरीलच रुमच्या लोखंडी कपाटामध्ये ठेवले होते. दरम्यान 25 डिसेंबर रोजी मध्यरात्री 03.18 दरम्यान, ग्रेडर कारभारी कचरु हारकाळ यांनी जिनिंग चालक ओंकार खुर्पे यांना फोनद्वारे कळविले की, दोन्ही तिजोरीतील रक्कम 47 लाख 78 हजार 400 रु. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT