Jejuri Khandoba Temple saam tv
महाराष्ट्र

Jejuri Khandoba Temple: आता जेजुरीच्या खंडोबा मंदिरातही ड्रेस कोड, देवस्थानाकडून 'या' कपड्यांवर बंदी

Dress Code at Khandoba Temple: पुणे जिल्ह्यातल्या जेजुरी येथे असणाऱ्या खंडोबा मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. देवस्थान समितीने ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला असून भाविकांनी देखील याला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Priya More

मंगेश कचरे, बारामती

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी आहे. जेजुरीच्या खंडोबा मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. आजपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.

यापुढे खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान आणि जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष आणि महिला भाविकांना मंदिरांत तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.

फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा आणि तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यामुळे आता जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना अंगावर पूर्ण आणि व्यवस्थित कपडे परिधान करूनच दर्शनासाठी यावे लागणार आहे.

मंदिरात येताना मंदिराचे पावित्र्य जपले जावे यासाठी राज्यभरातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेसकोड जारी करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातल्या जेजुरी येथे असणाऱ्या खंडोबा मंदिरामध्ये देखील ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यातील ५२८ मंदिरामध्ये वस्त्र सहिंता लागू करण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य जपाने हाच आमचा उद्देश असून यासाठी लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितींकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT