jaydutt kshirsagar saam tv
महाराष्ट्र

Jaydutt Kshirsagar : ब्रिटिश, निजाम काळातही असं घडलं नाही, बीडची घटना अतिरेक्यांनाही लाजवेल : जयदत्त क्षीरसागर (पाहा व्हिडिओ)

चाैकशीअंती सत्य बाहेर येईल असेही जयदत्त क्षीरसागर यांनी नमूद केले.

विनोद जिरे

Beed News : आतंकी आणि अतिरेक्यांनाही लाजवेल अशा घटना बीड शहरात घडल्या. ब्रिटिश आणि निजाम काळातही अशा घटना घडल्या नव्हत्या. त्या दुर्देवाने बीड जिल्ह्यात घडल्या. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही अन्यथा बीडच्या इतिहासाला काळिमा फासला गेला असता असे मत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (jaydutt kshirsagar latest marathi news) यांनी व्यक्त केले. (Maharashtra News)

मराठा आरक्षण आंदोलनात बीड येथे झालेल्या जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनेनंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच कार्यालय, घर आणि दूध संघ पेटवून देण्यात आला होता. यामध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी आज त्यांच्या संस्था ऑफिसला भेट दिली. त्यानंतर क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या संपूर्ण घटने संदर्भात संताप व्यक्त करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले मराठा समाजातील घटकांसाठी आम्ही कायम कार्यरत राहिलाे आहे. आमच्यात मनभेद नाहीत. पाेलीस यंत्रणेची चाैकशी हाेईल. या घटनेच्या चाैकशीसाठी एका विशेष अधिका-याची नियुक्ती झाली आहे. चाैकशीअंती सत्य बाहेर येईल असेही क्षीरसागर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT