Jayant Patil, Eknath Shinde, barsu refinery
Jayant Patil, Eknath Shinde, barsu refinery Saam TV
महाराष्ट्र

Jayant Patil News : ही एकनाथ शिंदेंसाठी चिंतेची बाब : जयंत पाटील

विजय पाटील

Jayant Patil On Barsu Refinery : ज्येष्ठ नेते शरद पवारांचा राजीनामा कायम राहण्यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसले होते. राष्ट्रवादीपासून शरद पवार बाजूला गेले असते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते असे मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान बारसु रिफायनरीबाबत लाेकांवर जबरदस्तीने नव्हे तर त्यांना विश्वासात घेऊन सरकारने पुढचे पाऊल टाकणे आवश्यक हाेते असे पाटील यांनी नमूद केले. (Maharashtra News)

जयंत पाटील म्हणाले बारसूत स्थानिकांचा विरोध होत असताना त्यांचे समाधान करण्याचे तारतम्य सरकारने बाळगायला पाहिजे. लोकांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे होतं,मात्र ते झालं नाही. विकास करताना लोकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. ते टाळून काेण रेटा रेटी करत असेल तर त्यातून प्रश्न तयार होतात असेही पाटील यांनी नमूद केले.

...तर एकनाथ शिंदेसाठी चिंतेची बाब

देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन म्हणणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं. ते म्हणाले एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेल्या त्या चाळीस वीरांनी मी पुन्हा येईन म्हणणा-यांची चिंता केली पाहिजे. कदाचित दाेन नंबरवरुन त्यांना एक नंबरवर बसायचे असेल त्यामुळेच त्यांनी वक्तव्य केले असेल असेही जयंत पाटील यांनी म्हटलं. पुढील निवडणुकांमध्ये निवडून येत नसल्याने भाजपाकडून राज्यातले इतर पक्ष फोडण्याचे कारस्थान गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News: डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या; वऱ्हाडी मंडळींवर चढवला हल्ला, लोक पळतच सुटले

Vegetables Rate Increased In APMC: उष्णता वाढल्यामुळे आवक घटली; भाजीपाला महागला, काय आहेत आजचे दर?

Jalana News: हृदयद्रावक! बोअरवेल सुरू करताना विद्युत केबलने पेट घेतला.. महिलेचा होरपळून मृत्यू; जालना हळहळलं

Maharashtra Lok Sabha 2024: सभेला उत्तर सभेने! महाविकास आघाडी एकजुटीने मैदानात; आज पुण्यात जाहीर सभा

Weather Forecast: विदर्भासह मराठवाड्यात आजही कोसळणार पाऊस; मुंबईसह ठाण्याला उष्णतेचा 'यलो अलर्ट', वाचा वेदर रिपोर्ट

SCROLL FOR NEXT