jayakwadi water level today Saam TV
महाराष्ट्र

Jayakwadi Dam Storage : नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ; वाचा आजची आकडेवारी

Jayakwadi Dam Water Level : गेल्या आठ दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 12 टक्क्यांवर पोहचला आहे.

Satish Daud

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज रविवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळालाय. छोटी तळे, ओढ्यात पाणी जमा होऊ लागल्याने बळीराजा सुखावलाय. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय.

त्यामुळे मराठवाड्यातील (Marathwada) सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. गेल्या आठ दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 12 टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या गोदावरी नदीतून जवळपास 6 हजार क्युसेक वेगाने पाणी जायकवाडी धरणात येत आहे.

जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam Water) मराठवाड्यातील अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने जायकवाडी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांवर भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं.

सद्यस्थितीला छत्रपती संभाजीनगर शहराला 8 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीपातळीत वाढ होऊन शहरावरील पाणीटंचाईचं संकट मिटावं, अशी प्रार्थना अनेकजण करीत आहेत. दरम्यान, आज पुन्हा अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

त्यामुळे गोदावरील नदीला पूर आला असून मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावलं आहे. पाण्याची अशीच आवक सुरू राहिल्यास जायकवाडी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्याला पावसाने झोडपल्याने गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT