Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News: सातबारा तुमच्या नावाने आहे का? भुजबळांच्या प्रश्नाला 7/12 तारखेला जरांगे देणार प्रत्युत्तर

Hingoli News: भुजबळांनी तरुणांना संबोधित करताना मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी जरांगे पाटील ७ डिसेंबर रोजी जाहीर सभा घेणार आहेत.

Ruchika Jadhav

Jarange Patil Vs Chhagan Bhujbal:

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात सातत्याने शाब्दिक चकमक होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी भुजबळांनी तरुणांना संबोधित करताना मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी जरांगे पाटील ७ डिसेंबर रोजी जाहीर सभा घेणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातबारा तुमच्या नावाने आहे का?

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. गावागावात नेत्यांना गावबंदी असल्याचे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी समाजाच्या मेळाव्यात महाराष्ट्रातील सातबारा तुमच्या नावाने आहे का?, असा सवाल करत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला होता.

प्रत्युत्तर देण्यासाठी निवडली 7/12 तारीख

छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) याच टीकेला उत्तर देण्यासाठी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची चौथ्या टप्प्यातील सभा येत्या ७ तारखेला हिंगोलीत होणार आहे. सातबारावरून भुजबळांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी सातबारा या तारखेला या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील सातबारा नेमका कुणाच्या नावाने आहे? याचे उत्तर मनोज जरांगे पाटील या सभेतून देणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान हिंगोलीच्या दिग्रस फाटा येथे होणाऱ्या या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलीये. तब्बल ११० एकरवरील मैदान या सभेसाठी सज्ज झाले आहे. तर दीडशे एकरवर सभेसाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

Solapur: सोलापूर हादरले! पहाटे ट्रेनवर थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण; महिलांनाही सोडलं नाही, मोबाईल अन् दागिने लुटले

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

SCROLL FOR NEXT