Jamkhed News Saam Tv
महाराष्ट्र

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिवृष्टीमुळे पुल खचला, वाहतूक ठप्प

Rain News: पिंपळवाडी गावातील लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात, साम टीव्ही, प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी गावातील लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनचालकांनी या मार्गी जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यातच सौताडा जवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे अनेक वाहनधारक तसेच बीड, अंमळनेर कडे जाणारे वाहने पिंपळवाडी मार्गी वांजरा फाटा मार्गी जात असतात, यात अनेक बस पण याच मार्गी जात असतात. पण आता पुल खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

पिंपळवाडी ग्रामस्थांनी भर पावसात नदी किनारी येऊन वाहनचालकांना आवाहन केले व वाहने माघारी पाठवले काही बस तसेच मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने माघारी गेले.

साकत कोल्हेवाडी मार्गावर साकत जवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे.

आज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. यामुळे नदीला पूर आला होता. यातच पिंपळवाडी जवळील लेंडी नदीवर असलेल्या पुलाला आगोदरच काही ठिकाणी तडे गेले होते. आता तर पुलच खचलेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. हा पुल पीएमजेएसकडे आहे. मोजमाप झाले आहे, पण काम कधी होणार, याची नागरिकांना प्रतिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : अवकाळी पावसाने राज्याला झोडपलं; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; कुठे,कसं असेल हवामान वाचा

Maharashtra Live News Update: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी

Curry Leaves Water For Weight Loss: रोज सकाळी प्या 'कढीपत्त्याचं पाणी', वजन होईल भरभर कमी

Namo Shetkari Yojana: खुशखबर! राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट ₹२००० जमा होणार ; तारीख आली समोर

Petrol Price : पेट्रोलच्या किंमती वाढल्या, गॅस सिलिंडरनंतर पॉवर पेट्रोल महागलं, वाचा पुण्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT