Manoj Jarange Associate Sanjay Katare Faces ₹4.90 Crore Sand Mining Penalt saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे सहकारी चौकशीच्या फेऱ्यात; वाळू तक्सरीत संजय कटारेंना 5 कोटींचा दंड

Jalna Sand Mining Case : मनोज जरांगेंच्या जरांगेंच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का बसलाय. वाळू तस्करी प्रकरणात जरांगेंच्या सहकाऱ्याला कोट्यवधीचा दंड ठोठावण्यात आलाय. मात्र, ही कारवाई जरांगेंमुळे टळली होती का? जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी काय आरोप केलेत? त्यावर जरांगेंनी काय भूमिका घेतलीये? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

Rohit Kadam

मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे सहकारी आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलीये. जरांगेंच्या आंदोलनाच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय नानासाहेब कटारेंना मोठा धक्का बसलाय. कटारेंना 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांच्या दंड ठोठावण्यात आलाय.

एव्हंढच नव्हे तर दंड कायम करून वसुलीच्या निर्देशांसह तत्कालीन तहसीलदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्तावही मांडण्यात आलाय. विशेष म्हणजे, जरांगेंचे जुने सहकारी अजय बारस्करांनी याआधीच जरांगेंवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. संजय कटारेंच्या वाळूचोरीच्या गुन्ह्यात जरांगेही सहभागी असल्याचा गंभीर आरोप बारस्करांनी केलाय. मात्र, माझ्याविरोधात मोठं षड्यंत्र करण्याचा प्रयत्न असला तरी मागे हटणार नसल्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय

विशेष म्हणजे, जरांगेंनी सरकारला 3 महिन्यांचा अल्टिमेटम दिला असला तरी सहकाऱ्यांवरील कंत्राट आणि वाळू चोरीच्या आरोपांमुळे जरांगेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण यामुळे आरक्षणाच्या लढाईला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काळात जरांगेंच्या आणखी किती सहकाऱ्यांची प्रकरणं बाहेर येणार आणि त्यामुळे जरांगे आणि सरकारमधला संघर्ष वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAचा कारवाईचा धडाका सुरूच; मुंबईतील 100 वर्षाहून जुन्या बेकरीचा FSSAI परवाना निलंबित

Cylinder Blast : जेवण बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, ३ घरं कोसळली, लहान मुलासह चौघांचा मृत्यू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; मुख्य परीक्षेची तारीख बदलली

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने गणपती मंडळाची लोखंडी कमान भररस्त्यात कोसळली

LPG सिलिंडर आता लोनवर, कोणतेही व्याज नाही; फक्त महिना ₹१०० मोजावे लागणार, योजनेचा कसा घ्यावा लाभ?

SCROLL FOR NEXT