Raj Thackeray Jalna Police News Saam TV
महाराष्ट्र

Jalna News : राज ठाकरेंचा ताफा अडवाल तर जेलमध्ये जाल; पोलिसांनी बजावल्या मराठा पदाधिकाऱ्यांना नोटीसा

Raj Thackeray visit Jalna : राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न कराल, तर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसीतून देण्यात आला आहे.

Satish Daud

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (ता. ९) त्यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या होत्या. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आज राज ठाकरे हे जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) जालन्यात येण्याआधी १० ते १२ मराठा पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न कराल, तर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसीतून देण्यात आला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 168 प्रमाणे या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्या दरम्यान काळे झेंडे दाखवणे, निदर्शन करने, यासह महत्वाच्या व्यक्तीच्या गाड्या अडवल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही या नोटीसीतून देण्यात आलाय. यामुळे मराठा पदाधिकारी (Maratha Reservation) आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

"महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही"

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी शांतता रॅली देखील काढली आहे. राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असं जरांगे यांचं म्हणणं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत बोलताना मोठं विधान केलं होतं. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधाननंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होते. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे यांच्यावर 'टाडा' अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT