Police Inspector Shoes while saluting Shivaji Maharaj photo SaamTv
महाराष्ट्र

कडेलोट! छत्रपती शिवरायांना अभिवादन करताना पोलीस निरीक्षकाच्या पायात बूट; फोटो व्हायरल

Police Inspector Chhatrapati Shivaji Maharaj Insult : हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे .

Prashant Patil

जालना : जालन्यात पोलीस निरीक्षकांकडून पोलीस ठाण्यात शिवरायांचा अपमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बदनापूर पोलीस ठाण्यात शिवजयंती साजरी करताना पायात बूट घालून शिवरायांना अभिवादन करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जालन्यातील बदनापूर पोलीस ठाण्यातील हा फोटो आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे . दरम्यान, बदनापूरच्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता शिवप्रेमी करत आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांचा खुलासा

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बदनापूर पोलीस ठाण्यात साजरी केली आहे. शिवजयंती साजरी झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी अचानक फोटो काढण्यासाठी बोलावले आणि त्यावेळीचा हा फोटो असल्याच बदनापूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या ट्वीटबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी श्रद्धांजली वाहण्यावरून राजकीय वाद पेटला आहे. या श्रद्धांजली वाहण्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिल्याने वाद पेटलाय. त्यावरून सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर टीका केली.

राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिल्याने सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. निलेश राणे म्हणाले, 'राहुल गांधी यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. ते चीनमध्ये असल्यासारखं वक्तव्य करताहेत. ते परदेशात गेले, तरी भारताची बदनामी करतात. राहुल गांधी भारतीय नाहीत. केवळ त्यांचा पासपोर्ट आहे. त्यांना आपली संस्कृती माहिती नाही. त्यांना साधं जयंती आणि श्रद्धांजलीचा अर्थ कळत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

SCROLL FOR NEXT