jalna news young man wrote a letter to CM Eknath Shinde demanding maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही; मराठा तरुणानं मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहलं पत्र

Maratha Reservation News: जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहलं आहे.

Satish Daud

Maratha Reservation Latest News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यभरात साखळी आंदोलने सुरू आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. अशातच जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहलं आहे. (Latest Marathi News)

दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही, अशी कैफियत या तरुणाने पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे (CM Eknath Shinde) मांडली आहे. हर्षल मोतीराम फदाट, असं पत्र लिहणाऱ्या मराठा तरुणाचं नाव आहे. हर्षल हा जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातल्या बोरगाव फदाट गावचा रहिवासी आहे.

मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, संघर्ष हा आमच्या रक्तातच आहे. असं देखील हर्षलने आपल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची 14 ऑक्टोबरला जालना येथील अंतरवाली सराटी गावात जाहीर सभा होणार आहे.

या सभेला निमंत्रण देण्यासाठी मनोज जरांगे हे राज्यभरातील मराठा बांधवांची भेट घेत आहे. आपल्या आरक्षणाच्या हक्काच्या मागण्यासाठी मराठा समाजाचा आवाज सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येकाने 14 तारखेच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज जरांगे यांच्याकडून केलं जात आहे.

दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन राज्य सरकार उपोषण करणाऱ्या विविध आंदोलकांना देत आहे. हे आश्वासन सरकार कशाच्या आधारे देत आहे? असा प्रश्न करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मनाई आदेश जारी

बिश्नोई गँगच्या नावाखाली राजकीय हत्या होणार? दसरा मेळाव्यानंतर राऊतांचा खळबळजनक दावा

District Bank Elections: राज्यात जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा; बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

SCROLL FOR NEXT