Jalna Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime : शेताच्या बांधावरून वाद; जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; ११ जणांवर गुन्हा दाखल

Jalna News : जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील सातेफळ शिवारात शेतातील बांधावरून गावातील दोन कुटुंबांमध्ये वाद आहेत. या वादावरून १० ते ११ जणांच्या टोळक्याने २९ वर्षीय युवकाला शेतातच बेदम मारहाण

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: शेत जमिनीवरून असलेल्या जुन्या वादातून एका तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ गावात घडली आहे. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेत संशयित ११ जणांविरोधात जालन्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील सातेफळ शिवारात शेतातील बांधावरून गावातील दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु आहेत. या वादावरून १० ते ११ जणांच्या टोळक्याने एका २९ वर्षीय युवकाला शेतातच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोमीनाथ वाघ असं मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून शेतामधील बांधाच्या वादावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला होता. 

वादाचे रूपांतर हाणामारीत 

दरम्यान शेतात सोमनाथ वाघ असतांना बांधावरून समोरच्यांशी पुन्हा एकदा वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झालं. यावेळी जमलेल्या दहा ते अकरा जणांनी मिळून सोमनाथ यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत सोमनाथ हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

अकरा जणांवर गुन्हा दाखल 

दहा ते अकरा जणांनी या युवकाला बेदम मारहाण केली. दरम्यान सदर प्रकरण पोलिसात गेले असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तर जालन्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या संशयित ११ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टेम्पो ट्रँव्हलर बसचा अपघात

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Digital India Internship: कोणतीही परीक्षा नाही, थेट मंत्रालयात इंटर्नशिपची संधी; स्टायपेंडदेखील मिळणार; अर्ज कसा करावा?

Israel Lebanon conflict: जगात पुन्हा युद्धाचा भडका उडाला; भीषण हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT