Jalna Badnapr News  Saam TV
महाराष्ट्र

Jalna News : लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; जालना जिल्ह्यातील दुर्देवी घटना

दोन महिन्यांच्या बाळाला लसीकरणाचा डोस दिल्यानंतर त्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना (Jalna) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन महिन्यांच्या बाळाला लसीकरणाचा डोस दिल्यानंतर त्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना बदनापूर तालुक्यातील हिवराळा येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Jalna News Today)

सूरज राहुल राठोड असं मृत्युमुखी पडलेल्या दोन महिन्यांच्या बाळाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, बदनापूर (Badnapur) तालुक्यातील हिवराळा गावातील राहुल राठोड यांच्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याला लसीकरणासाठी शेलगाव येथील प्राथामिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते.

प्राथामिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत सूरजचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर अचानक सूरजची तब्येत खराब झाली. त्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सूरजचा मृत्यू झाला होता.

जिल्हा रुग्णालयाचे डॉ अंभोरे यांनी लसीकरणामुळेच सूरजचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. तसा अहवाल देखील अंभोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे. याप्रकरणी मृत सूरजच्या आई-वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT