Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: मुलीच्या लग्नासाठीची जमविलेली पुंजी लांबविली; दागिने व पैशावर चोरट्यांचा डल्ला

मुलीच्या लग्नासाठीची जमविलेली पुंजी लांबविली; दागिने व पैशावर चोरट्यांचा डल्ला

लक्ष्मण सोळुंके

जालना : मुलीच्या लग्नासाठी जमा करून ठेवलेले दागिने आणि पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडली. आज मध्‍यरात्रीनंतर सदर घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

अंबड तालुक्यातील धाकलगावात राहणाऱ्या सलीम मन्सून पठाण या शेतकऱ्याने (Farmer) आपल्या मुलीच्या लग्नासाठी (Marriage) दोन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 85 हजार रुपयांची रक्कम जमा करून आपल्या घरातील कपाटातील एका पेटीत ठेवली होती. ज्या घराच्या रुममध्ये हे कपाट होते, त्याचं रुममध्ये कापूस (Cotton) टाकण्यात आला होता. त्या रूमला बाहेरून कुलुप लावून बंद करून कुटुंब शेजारील रुममध्ये झोपलेले होते.

कुटुंब झोपलेल्‍या रूमचा दरवाजा केला बंद

दरम्‍यान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी कुटुंब झोपलेल्या रूमची कडी बाहेरून लावून दागिने असलेल्या दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. यानंतर कपाटातील दोन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 85 हजार रुपयांची रक्कम चोरी करून धूम ठोकली.

पोलिसांकडून तपास सुरू

पठाण हे सकाळी चार वाजता लघुशंकेला उठले असता त्यांच्या दरवाजाची कडी कुणी तरी बाहेरून लावल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी छतावरून खाली उतरून पाहिले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. नंतर त्यांनी घटनेची माहिती गोंदी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT