Jalna saam tv
महाराष्ट्र

Jalna: रुग्णालयातून चोरीला गेलेले ते बाळ सापडले; महिलाही ताब्‍यात

रुग्णालयातून चोरीला गेलेले ते बाळ सापडले; महिलाही ताब्‍यात

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयातुन सोमवारी सकाळच्या सुमारास एक दिवसाच्या बाळाची चोरी झाली होती. चोरीला गेलेले हे बाळ शोधण्यात जालना पोलिसांना (Jalna Police) यश मिळाले आहे. (jalna news The baby was found stolen from the hospital Women arrested)

सोमवारी सकाळच्या सुमारास जालन्यातील (Jalna) महिला आणि बाल रुग्णालयातून एका अज्ञात बुरखाधारी महिलेने बाळंतीन महिलेच्या नातवाईक असलेल्या महिलेची नजर चुकवून हे बाळ पळवले होते. आज सकाळी जालना पोलिसांनी या बाळाला परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सेलू येथून ताब्यात घेतले असून बाळ पळवणाऱ्या अज्ञात महिलेला देखील जालना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हे बाळ शोधण्यात जालना पोलिसांना यश मिळाल्याने बाळाच्या नातवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

पथक तयार करून केले होते रवाना

बाळ चोरीला गेल्यानंतर कदीम जालना पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महिला आणि बाल रुग्णालय गाठून तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू करत पोलीस पथक स्थापन करून विविध ठिकाणी रवाना केले होते. दरम्यान एका पोलिसांच्या पथकाला अज्ञात बुरखाधारी महिलेने पळवलेले बाळ परभणी जिल्ह्यातील सेलू येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञात बुरखाधारी महिलेला देखील ताब्यात घेण्यात आले. सध्या ही महिला कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात आहे. जालना पोलिसांनी आज सकाळी या बाळाला ताब्यात घेतल्याने सर्वत्र जालना पोलिसांचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT