Partur Police Station Saam tv
महाराष्ट्र

Jalna Police : निलंबनाच्या कारवाईनंतर पोलीस कर्मचारी गायब; जालना पोलिसात खळबळ, मिसिंगची तक्रार दाखल

Jalna News : परतूर पोलीस स्टेशनमधील देविदास जाधव असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव होते. काही दिवसांपूर्वी वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली होती

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जालन्याच्या परतूर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जालना पोलीस दलातील पोलीस कर्मचारी मागील पाच दिवसांपासून गायब असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

परतूर पोलीस स्टेशनमधील देविदास जाधव असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते जालन्यातील परतुर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला नोटीसवर सोडून देण्यात आले होते. मात्र या प्रकरणात कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी जालना पोलीस अधीक्षकांनी या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

कोणाला न सांगता गेले निघून 

पोलीस कर्मचारी जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर ते गायब झाले आहेत. ५ फेब्रुवारीपासून हा पोलीस कर्मचारी कुणाला न सांगता घरातून निघून गेले आहेत. यामुळे त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून जालन्यातील परतुर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास परतुर पोलीस करत आहे.

पोलिसांकडून तपास सुरु 

जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत जाधव या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. यानंतर लागलीच ते गायब झाल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र कुटुंबियांना ते सापडून न आल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलीस यंत्रणा देखील जाधव यांच्या शोधात लागली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT