Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा; घरावरील पत्रे उडाले, शेतकऱ्याचा संसार उघड्यावर

Jalna News : पावसामुळे धारकल्याण येथील शेतकरी रंगनाथ भुतेकर यांच्या घरावरील पत्रे उडाली आहे. यामुळे घरातील साठवलेल्या अन्नधान्यासह, संसार उपयोगी वस्तू आणि दुचाकीचे नुकसान

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : राज्यात मॉन्सूनचे आगमन होत असताना काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाने हजेरी लागली असून धारकल्याण शिवारात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडाल्याने घरात साठवलेल्या अन्नधान्यासह शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

जालन्यातील धारकल्याण शिवारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे धारकल्याण येथील शेतकरी रंगनाथ भुतेकर यांच्या घरावरील पत्रे उडाली आहे. यामुळे घरातील साठवलेल्या अन्नधान्यासह, संसार उपयोगी वस्तू आणि दुचाकीचे नुकसान झाल आहे. 

संसार उघड्यावर 

घराच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याचा संसार आता उघड्यावर आला आहे. ऐन पेरणीच्या काळात घरावरील पत्रे उडाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता शेतीची कामे सोडून प्रथम घरावरील छत उभारावे लागणार आहे. दरम्यान झालेल्या नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत करावी; अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. 

दोन दुचाकींचे नुकसान
जालन्यातील धारकल्याण शिवारात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे रंगनाथ भुतेकर या शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडाले, हे पत्रे थेट घरासमोर उभे असलेल्या दुचाकीवर जाऊन पडल्याने दोन दुचाकींचे देखील नुकसान झाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

Good News: 21,000 पगार अन् तगडा बोनस मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT