Bhokardan Vidhan Sabha  Saam tv
महाराष्ट्र

Bhokardan Vidhan Sabha : मविआत रस्सीखेच; शिवसेना ठाकरे गटाने ठोकला दावा

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
जालना
: माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार असलेल्या जालन्यातील भोकरदन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. कारण भोकरदन विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा ठोकला आहे.  

जालन्याच्या भोकरदन (Bhokardan) मतदारसंघ जा पारंपारिक राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असून आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड यांच्याकडून या जागेवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोकरदन मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा यांच्यामध्ये देखील लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे. 

जागा निवडून आणण्याचा दावा 

मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संतोष दानवे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटानेच आव्हान दिलं होते. मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ही जागा निवडून आणू शकते, असं म्हणत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड यांनी आता या जागेवर दावा सांगितला आहे. पक्ष नेतृत्वाने कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे देखील त्यांचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alcohol Viral Video: दारूमुळे होतो कॅन्सर? काय आहे सत्य? जाणून घ्या...

Harshvardhan Patil News : शरद पवारांकडून भाजपला सर्वात मोठा धक्का; पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता हाती तुतारी घेणार, वाचा

Maharashtra News Live Updates: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार?

Nashik News : दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Dasara Melava 2024 : रुग्णालयातून डिस्चार्ज, जरांगे थेट मैदानात! आरक्षणासाठी घेणार दसरा मेळावा

SCROLL FOR NEXT