Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: मित्र– मैत्रिणींसोबत फोटोशूट; सेल्फी काढताना हातातून मोबाईल निसटला अन्‌

मित्र– मैत्रिणींसोबत फोटोशूट; सेल्फी काढताना हातातून मोबाईल निसटला अन्‌

लक्ष्मण सोळुंके

जालना : सेल्फी काढताना तोल जाऊन खदानीत पडून पाण्यात बुडल्याने एका विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू (Death) झाल्याची घटना जालन्यातील खरपुडी शिवारात घडलीय. कैलास गिरी असे या विद्यार्थ्यांचे नाव असून हा विद्यार्थी (Student) कृषी तंत्र विद्यालयात शिक्षण घेत आल्याची प्राथमिक माहिती सामोर आली आहे. (Live Marathi News)

कैलास गिरी हा आज (Jalna) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तीन मित्र आणि दोन मैत्रिणींसोबत फोटोशूट करण्यासाठी खदानीच्या काठावर गेला होता. या दरम्‍यान सेल्फी (Selfie) काढताना त्याचा मोबाईल हातातून निसटला आणि पाण्यात पडला.

मोबाईल शोधताना गेला तोल

मोबाईल शोधण्याच्या नादात तो खदानीत उतरण्याचा प्रयत्‍न करत असताना त्यांचा तोल गेला. यात तो पाण्यात पडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यासह अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा मृत्यूदेह बाहेर काढला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deleted Messages : महत्वाचा मेसेज डिलीट झाल्यास १ सेंकदात करा रिकव्हर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

Tandoor Roti Recipe: ढाबा स्टाइल परफेक्ट तंदूर रोटी, घरीच १० मिनिटांत बनवा

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

SCROLL FOR NEXT