Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको; जालना- मंठा रोडवर वाहनांच्या रांगा

jalna News : नागपूर ते मुंबई असा तयार होत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्पाचे काम सुरु आहे. यासाठी अजूनही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरु आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालना- नांदेड समृद्धी महामार्गाची संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणीसाठी जालन्यातील देवमूर्ती येथे मागील महिन्याभरापासून समृद्धीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालन्यातील मंठा जालना रोडवरील सिंधी काळेगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे जालना मंठा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.

नागपूर ते मुंबई असा तयार होत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्पाचे काम सुरु आहे. यासाठी अजूनही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र महामार्गाची जात असलेल्या जमिनींसाठी योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप आहे. यामुळे जालना- नांदेड दरम्यानच्या मार्गासाठी संपादित जमिनीसाठी चांगला मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या 

समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनीला जास्त नको, पण जास्त भाव द्या. सर्वाधिक बाजारभावाच्या पाचपट जमिनीला मोबदला द्या. २०२२ मध्ये विविध विभागांनी केलेल्या संयुक्त मोजणीप्रमाणे दिलेल्या मुलांकनानुसार मागे जाण्यात यावा. तर २०२३ मध्ये निघालेला KML चा २०२१ च्या अधिसूचनेला लागू करण्यात येऊ नये, सदरील जीआर या प्रकल्पासाठी रद्द करण्यात यावा. याप्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांनी जालना मंठा रोडवरील सिंधी गाळेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
मागील महिनाभरापासून समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे जालन्यातील देवमूर्ती येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांनी जालना- मंठा रोडवरील सिंधी काळेगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले आहे. दरम्यान शासनाने लवकरात लवकर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू; असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT