Jalna Police Saam tv
महाराष्ट्र

Jalna Police : घरात साठवलेला ९ लाखांचा गांजा जप्त; गोंदी पोलिसांची कारवाई

Jalna News : अंमली पदार्थ वाहतूक व विक्रीस बंदी करण्यात आलेली आहे. असे असताना देखील चोरून विक्री केली जात असते. प्रामुख्याने गांजाची लागवड करत त्याची विक्री सर्रासपणे केली जात असते

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: गांजा विक्री करण्यास बंदी असताना देखील विक्री करण्याच्या अनुषंगाने त्याची सर्रासपणे वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. याबाबत पोलिसांकडून कारवाई होत असताना देखील छुप्या पद्धतीने गांजा विक्री करण्यात येत असते. अशाच प्रकारे जालन्यात पोलिसांनी विक्रीसाठी आणून घरात साठविलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. यात साधारण १९ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. 

अंमली पदार्थ वाहतूक व विक्रीस बंदी करण्यात आलेली आहे. असे असताना देखील चोरून विक्री केली जात असते. प्रामुख्याने गांजाची लागवड करत त्याची विक्री सर्रासपणे केली जात असते. अशाच प्रकारे जालन्यातील महाकाळा गावात गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जालन्यातील महाकाळा गावात अवैधरित्या गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. 

९ लाखांचा गांजा केला जप्त 

जालन्याच्या महाकाळा गावात होत असलेल्या विक्रीबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी धाड टाकत घरात तपासणी केली असता घरामध्ये साधारण २९ किलो गांजा पोलिसांना आढळून आला. या गांजाची बाजारात ९ लाख रुपये इतकी किंमत असून पोलिसांनी हा सर्व गांजा जप्त करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी पोलीसांकडून गांजा आणला आहे. याबाबत चौकशी केली जात आहे. 

चार जणांना घेतले ताब्यात 

पोलिसांनी केलेल्या कारवाई गांजा विक्री करणाऱ्या चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर याप्रकरणी संशयित आरोपींविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चौघांची चौकशी करून गोंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT