Jalna Police Saam tv
महाराष्ट्र

Jalna Police : वाळू माफियांची परेड; जालना पोलिसांनी ३० माफियांकडून लिहून घेतले बंदपत्र

Jalna News : जालना जिल्ह्यात वाळू चोरी बरोबरच दहशत पसरवणाऱ्या वाळू माफियांची आज अप्पर पोलीस अधीक्षकांनी परेड घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी वाळू गुन्ह्यातील आरोपींना बंदपत्र लिहून घेतले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: वाळू माफियांची मुजोरी मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळते. पोलीस किंवा महसूल प्रशासनाकडून कारवाई करून देखील त्यांची मुजोरी थांबलेली पाहण्यास मिळत नाही. अशातच जालना पोलीस अधीक्षकांनी या वाळू माफियांवर जरब बसविण्यासाठी परेड सुरु केली आहे. यात जालना व भोकरदन तालुक्यातील ३० वाळू माफियांकडून बंदपत्र लिहून घेतले आहे. यामुळे वाळू चोरीवर अंकुश बसणार आहे. 

जालना जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाळू चोरी जोरदार सुरु आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अवैध वाळू चोरी आणि त्या संबंधाने इतर अनेक गुन्हे समोर येत असून काही दिवसापूर्वीच वाळूच्या ढिगार्‍याखाडी दबून पाच जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला होता.  यानंतर पोलिसांनी वाळू माफियांच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने या वाळू माफियांची परेड घेण्यास सुरवात केली आहे. 

लिहून घेतले बंदपत्र 

जालना जिल्ह्यात वाळू चोरी बरोबरच दहशत पसरवणाऱ्या वाळू माफियांची आज अप्पर पोलीस अधीक्षकांनी परेड घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी वाळूच्या गुन्ह्यातील आरोपींना बंदपत्र लिहून घेतले आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा आणि विविध गुन्ह्यातील आरोपी असलेल्या वाळू माफियांना सज्जड इशारा देत अप्पर पोलीस अधीक्षकांनी देत यापुढे वाळूच्या गुन्ह्यात आढळल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. 

तर होणार तडीपारीची कारवाई 

जिल्ह्यातील जालना व भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही तालुक्यात वाळू उपसा करणार्यांना पोलीस अधीक्षकांनी तंबी दिली आहे. यात ३० जणांकडून बंधपत्र लिहून घेतले असून बंदपत्राचे उल्लंघन झाल्यास थेट तडीपारची कारवाई करण्यात येणार असल्याचा दमच वाळू माफियांना देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

MLC Election : परभणी-हिंगोलीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला, श्रीकांत शिंदेंच्या विश्वासूला संधी; नेमकं गणित काय?

SCROLL FOR NEXT