Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठीच्या सुविधा नसल्यानं रुग्णाहिकेतच प्रसुती

ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठीच्या सुविधा नसल्यानं रुग्णाहिकेतच प्रसुती

लक्ष्मण सोळुंके

जालना : प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला इथं सुविधा नसल्याचे सांगत डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. महिलेला जिल्‍हा (Hospital) रुग्णालयात नेत (Jalna News) असतानाच रस्‍त्‍यावर असह्य वेदना सुरू झाल्‍या. यामुळे सदर महिलेची प्रसुती रुग्णवाहिकेतच झाली. (Live Marathi News)

गरोदर महिलेला प्रसुतीसाठी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वेदना सुरू झाल्याने रुग्णवाहिकेतील डॉ. देशमुख व चालक गोरे यांनी रुग्णवाहिका परतूर- जालना महामार्गावरील विरेंगाव टोल नाक्यावरच थांबून महिलेच्या आईच्या मदतीने यशस्वी आणि सुरक्षित प्रसूती केल्याची घटना घडली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. शीतल शेजुळ असे या महिलेचे नाव असून ती पुण्याहून परतूर या ठिकाणी माहेरी आली होती.

सुविधा द्याव्‍यात

परतूर येथील तालुका शासकीय रुग्णालयात कुठल्याच सुविधा नसल्याचं कारण देत महिलेला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान तालुक्याच ठिकाण असताना ही परतूर तालुका आरोग्य केंद्रात कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णालय रेफर रुग्णालय झाल्याने या ठिकाणी आरोग्य विभागाने तात्काळ सुविधा निर्माण कराव्या; अशी मागणी नागरिकांनी केली. तर रुग्णवाहिकेतील (Ambulance) डॉक्टरांनी वेळीच रुग्णवाहिका थांबवून चालकाच्या मदतीने यशस्वी प्रसूती करून महिला आणि बाळावर योग्य ते उपचार केल्याने बाळ आणि आई सुखरुप असल्याची भावना महिलेचे वडील सुभाष अंभिरे यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT