Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna: चोर समजून एकाला बेदम मारहाण; मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू

चोर समजून एकाला बेदम मारहाण; मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : तालुक्यातील मानदेऊळगाव येथील डोळस यांच्या घराजवळ पाऊस आल्‍याने आडोशाला उभ्या असलेल्या तरुणाला चोर समजून लाठ्या काढ्या आणि लोखंडी रॉडने (Crime) मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू (Death) झाल्याची घटना रात्री पाऊनेनऊच्या सुमारास घडली. (Jalna Crime News)

संजय प्रभाकर पवार असे मृत्यू पावलेल्या आदिवासी तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर (Jalna) मारहाण करणाऱ्यांनी पोलिसांना (Police) चोरी करणाऱ्या चोराला लोकांनी मारहाण केल्याचा माहिती दिली. त्यानंतर चंदणझिरा पोलिसांची मोबाईल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली असता तरुणाचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृत्यूदेह जालन्यातील शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल केला असता.

भावाने दाखल केली फिर्याद

पवार यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती आज दुपारी मिळाल्यानंतर त्यांनी जालना शासकीय रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी मयत संजयचा भाऊ रामेश्वर पवार यांनी आपला भाऊ पाऊस आल्‍याने आडोशाला उभा असतांना तीन जणांनी त्यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केला असल्याची फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी संशयित तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फिर्यादीनंतर विभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह चंदणझिरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणी अधिक तापस करत आरोपीचा शोध सुरू केला असून या प्रकरणी अधिक तपास चंदनझिरा पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT