Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: '१० दिवसात आरक्षण द्या अन्यथा...' विराट सभेतून जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil Full Speech: विराट सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एल्गार करत राज्य सरकारवर हल्ला चढवला.

Gangappa Pujari

Manoj Jarange Patil Sabha:

मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात विराट सभा होत आहे. राज्यभरातील मराठा बांधव या सभेसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आहे. या विराट सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एल्गार करत राज्य सरकारवर हल्ला चढवला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज घराघरातला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार होतो, हे सांगेल, घराघरातील मराठा आरक्षणासाठी पेटून उठला आहे, असे म्हणत सरकारला उरलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा, अशी मागणी केली. तसेच आरक्षणाच्या मागणीवरुन एक इंचही मागे सरणार नाही, असा खणखणीत इशाराही सरकारला दिला.

छगन भुजबळांवर पुन्हा टीका...

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जरांगे पाटलांच्या सभांसाठी पैसे कुठून येतात? असा सवाल उपस्थित केला होता. यावरुन अंतरवालीच्या सभेतून जरांगे पाटलांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला.

सदावर्तेंनाही फटकारले..

यावेळी सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांचाही समाचार घेतला. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केली होती. यावरुन बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांनी असे येडपाट का पाळले आहेत, त्याला योग्य ती समज द्या.. अशा शब्दात गुणरत्न सदावर्तेंना फटकारले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT