Manoj Jarange Patil Cry Video Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंना अश्रू अनावर, गहिवरलेल्या आवाजात मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

Manoj Jarange Patil Cry News: मनोज जरांगेंना अश्रू अनावर, गहिवरलेल्या आवाजात मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

Satish Kengar

Manoj Jarange Patil Cry Video :

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. अकराव्या दिवशी आज त्यांची आई आणि गावातील लोक त्यांचा भेटण्यासाठी आंदोलनस्थळी आले होते. आई आणि गावकऱ्यांना पाहून जरांगे यांना अश्रू अनावर झाले.

डोळ्यात अश्रू आणि गहिवरलेल्या आवाजात मनोज जरांगे यावेळी म्हणाले की, ''आज माझ्यासाठी माझा मराठा समाज घराघरातून पेटून उठला आहे.'' ते म्हणाले, मराठा समाजातील बांधवाना सांगतो, आतापर्यंत आरक्षणासाठी जे बळी पडले, या पुढे तसं न होऊन देण्याचा मी विडा उचलला आहे. तुमच्या एकाचीही ताकद वाया जाऊ देणार नाही, असं ते भावनिक होऊन म्हणाले आहेत.

मनोज जरांगे म्हणाले की, ''आज मला कळलं की, माझं संपूर्ण गाव घराला टाळे लावून माझ्याकडे येत आहे. माझी छाती भरून गेली. संपूर्ण महाराष्ट्र माझ्या मागे उभा आहे.'' ते म्हणाले की, ''मी माझ्या सगळ्या बांधवांना सांगतो की, तुमची ताकद मी माझ्या वैयक्तिक कामासाठी न वापरता, कोट्यवधी मराठ्यांच्या मुलांचं कल्याण करून भगवा झेंडा फडकवीन तेव्हाच शांत बसेल.  (Latest Marathi News)

जरांगे यांना चर्चेसाठी राज्य सरकारने मुंबईला बोलावलं

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना सरकारने चर्चेसाठी मुंबईला येण्यास सांगितलं आहे. संध्याकाळी साडेदहा वाजता सह्याद्री अतिगृहामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला जणांची शिष्टमंडळ आज सायंकाळच्या विमानाने संभाजीनगर विमानतळावरून रवाना होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यानंतर सरकारने काढलेला आदेश, त्यातील सुधारणा यावर चर्चा करून पुढील तोडगा काढण्यासाठी ही बैठक होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT