Antarwali Sarati Maratha Meeting  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange: अंतरवाली सराटीतील निर्णायक बैठकीआधी मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, 'मला तडीपार...'

Antarwali Sarati News: लोकसभा निवडणुकीवरुन राज्याचं राजकीय वातावरण तापलं असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना, Satish Daud

Antarwali Sarati Maratha Meeting

लोकसभा निवडणुकीवरुन राज्याचं राजकीय वातावरण तापलं असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. दरम्यान, बैठकीआधी मनोज जरांगेंनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असून कोणत्याही बदनामीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. मी मरेपर्यंत समाजाच्या बाजूनं उभं राहणार आहे, असं जरांगे यांनी ठामपणे सांगितलं आहे. राज्य सरकारकडून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू आहे. आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. (Breaking Marathi News)

आणखी दहा पंधरा गुन्हे दाखल करणार आणि मला ते राज्यातून तडीपार करणार आहेत, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरीही मी समाजाशी नातं तुटू देणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने तातडीने सगेसोयरे अधिसूचना काढून कायदा करावा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला केलं आहे.

अपेक्षित नसलेल्या गोष्टी झाल्या की समाज एकवटतो, मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की आम्ही टिकणाऱ्या आरक्षणाच्या बाजूनं आहोत. मी माझ्या समाजाच्या हिताचं बोलत आहे. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला समाजासाठी काम करायचं आहे, असं जरांगे म्हणाले.

अंतरवाली सराटी येथे आज होणाऱ्या बैठकीला लाखो मराठा बांधव आले असून आणखीही मराठे येणार आहेत. समाजाला विचारून समाजाच्या हिताचा निर्णय घेणार आहे, असंही जरांगे म्हणाले. सरकारने आचारसंहितेच्या अगोदर आरक्षणाबाबत का निर्णय घेतला नाही? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT