Ambad Farmer News Saam TV
महाराष्ट्र

Jalna News : अंबड हादरलं! कर्जबाजारीपणाला कंटाळून पती-पत्नीने संपवली जीवनयात्रा

पती-पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना/अंबड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जोरदार भाषण करताना आत्महत्या मुक्त राज्य करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा ताजी असतानाच, जालना (Jalna) जिल्ह्यात एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केलीय. पती-पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. (Ambad Todays News)

अंबड (Ambad) तालुक्यातील वडीकाळ्या या गावात ही घटना घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय ढेबे (वय 45) आणि संगीता ढेबे (वय 40) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. सदरील घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

या दोघांनीही आत्महत्येसारखं इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, ढेबे कुटुंबाच्या शेजाऱ्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांच्या कानावर हा प्रकार घातला. (Jalna Todays News)

दरम्यान, एका खासगी बॅंकेचे कर्ज असल्याने ते फेडायचे कसे या विवेचनेतून पती-पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली. असा आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी गोंदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करतायत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

SCROLL FOR NEXT