Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: शासकीय नर्सिंग कॉलेजच्या चार विद्यार्थिनींना पाण्यातून विषबाधा

शासकीय नर्सिंग कॉलेजच्या चार विद्यार्थिनींना पाण्यातून विषबाधा

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना सिव्‍हील हॉस्पिटल येथील नर्सिंग कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी (Student) विद्यार्थ्यांना पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना जालन्यात घडली. चार विद्यार्थिना ही विषबाधा झाल्याने त्यांना (Jalna News) जालन्यातील सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

जालना सिव्‍हील हॉस्पिटल येथील नर्सिंग कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी असलेल्‍या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्राचार्या यांनी एका मुलीच्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाल आढळून आल्याने आणि तिने हे पाणी पिल्यानंतर तिला त्रास सुरु झाला. मात्र इतर मुलींना तिने ही बाब सांगितल्यानंतर त्यांची मानसिकता तशी झाल्याने त्यांना नॅचरली त्रास झाल्याचे जाणवू लागला. त्यांना तसा कुठलाही त्रास नसल्याची प्रतिक्रिया देत त्यांनी या प्रकरणावर सावरा सावर करण्याचा प्रयन्त केला आहे.

एकीला डिस्‍चार्ज

चार प्रशिक्षणार्थी बाधा झाल्यानंतर एका विद्यार्थिनीला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून तिघींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिता जाधव, प्रिया साळवे, वैष्णवी काळे असे तिघी विषबाधा झालेल्या प्रशिक्षणार्थीचे नाव असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या युवकाला जीवदान

Tuesday Horoscope: भरभराट होणार! ५ राशींच्या हातात पैसा खेळता राहील, वाचा उद्याचे राशीभविष्य

Datia Bypoll Result: डाव टाकला, पण फसला! भाजपला तगडा झटका; काँग्रेसच्या उमेदवारानं चारली धूळ, निकाल का फिरला?

काँग्रेसचा सुपडासाफ! ऐतिहासिक विजय नोंदवून भाजपनं राखला १८ वर्षांचा बालेकिल्ला, कोणाला किती मिळाली मते?

मैत्रीत 'या' लोकांना नेहमीच मिळतो धोका; मित्रासाठी जीव द्यायला असतात तयार, तरीही होतो दगाफटका

SCROLL FOR NEXT