Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News : गाडी धुण्याच्या वादातुन एकावर जीवघेणा हल्ला

Jalna News गाडी धुण्याच्या वादातुन एकावर जीवघेणा हल्ला

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या वाशिंग सेंटरवर गाडी धुण्यावरून (Jalna News) झालेल्या किरकोळ कारणावरून वाद झाला. (Crime News) या वादातून एकाला आज पोटात खंजीर खुपसून गंभीर जखमी केल्याची घटना शिवाजी पुतळा परिसरात घडली आहे. (Breaking Marathi News)

शेख अलीम शेख जमील अस यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान सोमवारी (३१ जुलै) शेख अलीम हा वाशिंग सेंटरवर गाडी धूत असताना त्याचा एकाशी काल वाद झाला होता. त्या वादानंतर आज तिघेजण मोटरसायकलवरून जालना शहरातील वशिंग सेंटरजवळ आले. त्यांनी गाडी उभी करून (Police) खाली उतरून शेख अलीम याच्याजवळ आले आणि त्यांनी कमरेला खोसलेला खंजर काढून अलीम याच्या पोटात खुपसला. यात शेख अलीम हा जखमी होऊन खाली पडला. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धुम ठोकली. 

पोलिसांकडून तपास सुरु 

परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणाला रिक्षामध्ये टाकत घाटी रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी पाहणी करून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात रेफर केले. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तीनही आरोपीचा शोध सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT