Samruddhi Mahamarg Accident Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डुलकी लागल्याने समोरच्या ट्रकला मागून धडक, एक ठार, दोन जखमी

Jalna News : नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील आठवड्यातच क्रूझरचे तयार फुटल्याने थेट कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. याच दरम्यान पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा गावाजवळ सकाळी तीन वाजता अपघाताची घटना घडली असून यात एकाच जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  

नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील आठवड्यातच क्रूझरचे तयार फुटल्याने थेट कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातांची मालिका अजूनही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळते. यानंतर पुन्हा एकदा अपघात झाला. हा अपघात दोन ट्रकमध्ये झाला असून यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. 

मागून येत जोरदार धडक 

समृद्धी महामार्गावर बदनापूर तालुक्यातील सोमठाना गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास रायपूरहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने समोर चालत असणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत. ट्रकचा वेग जास्त असल्याने धडक जबरदस्त होती.  

महामार्गावर वाहतूक कोंडी 

पहाटेच्या सुमारास दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त दोन्ही ट्रक बाजूला करण्यात आले. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT