Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: जालन्यात बनावट खताचा गोरख धंदा उघड; बनावट खत साठ्यासह रिकाम्या गोण्याच्या साठा जप्त

जालन्यात बनावट खताचा गोरख धंदा उघड; बनावट खत साठ्यासह रिकाम्या गोण्याच्या साठा जप्त

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात सुरू असलेल्या बनावट खात्याचा गोरख धंदा उघड करण्यास (Jalna News) राज्य मुख्य गुणवत्ता अधीक्षक कार्यालयाच्या पथकाला यश आले आहे. तीर्थपुरी गावातील शहागड रोड परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे पथकाने धाड टाकून पत्र्याच्या सेडमध्ये सुरु असलेला हा गोरख धंदा उघड केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. (Live Marathi News)

पुण्यातील राज्य मुख्य गुणवत्ता अधिक्षक कार्यालयाला जालन्यातील तीर्थपुरी गावात बनावट रासायनिक खताचा गोरख धंदा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुणवत्ता अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने शहागड रोडवर असलेल्या प्राथमिक केंद्राच्या पाठीमागे असलेल्या पत्राच्या शेडमध्ये धाड टाकली. येथे हलक्या दर्जाचा (Fertilizer) खताचा वापर करून ते मिश्र करून त्यापासून नामांकित कंपन्याच्या नावाने हुबेहूब खत तयार करून कंपन्यांच्या ब्रँड असलेल्या गोण्यामध्ये ते भरून पॅकिंग करत मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पाचशेहून अधिक गोण्याचा साठा जप्‍त

बोबडे यांच्या शेतात गोदामात हा बोगस खताचा कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पथकाने या धाडीत जवळपास नामांकित कंपन्यांच्या विविध ब्रँडच्या रिकाम्या गोण्यासह पाचशेपेक्षा अधिक बोगस खतांनी भरलेल्या गोण्याचा साठा व त्यासाठी लागणारे पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत आणखी मोठा साठाही मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बनावट खतांचे रॅकेट राज्यभर असल्याची शक्यता या पथकाकडून वर्तविली जातं असून आतापर्यंत या ठिकाणाहून कुठं कुठं बोगस खाताचा पुरवठा केला गेला. याचाही तपास हे पथक करत आहे. तर घटनेची माहिती मिळताच जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह तालुका कृषी विभागाचे अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT