Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : मद्यधुंद मुख्याध्यापक वर्ग खोलीतच काढतोय झोप; टाकळी जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Jalna News : दुसरीच्या वर्गात हा प्रकार उघडकिस आला आहे. ज्यावेळी गावचे माजी सरपंच आणि अन्य काही नागरिक त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत झोपलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: भोकरदन तालुक्यातील टाकळी गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी चक्क मुख्याध्यापकच आपल्या शाळेच्या वर्ग खोलीत मद्यधुंद अवस्थेत असून ते झोपलेले आढळून आले. या धक्कादायक प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यानंतर सदर मुख्याध्यापकावर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात असलेल्या शाळेत काही शिक्षण गैरप्रकार करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. काही ठिकाणी शिक्षक दारूच्या नशेत आलेले तर काही ठिकाणी वर्गात विद्यार्थी असताना शिक्षक झोपलेले आढळून आले आहेत. तर जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेचे मुख्याध्यापक दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले आहेत. 

सरपंचाच्या भेटीत समोर आला प्रकार 

टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दामू भीमराव रोजेकर आहेत. शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात हा प्रकार उघडकिस आला आहे. ज्यावेळी गावचे माजी सरपंच आणि अन्य काही नागरिक त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत झोपलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इतकेच नाही तर त्याने त्याच जागेवर लघुशंका देखील केल्याची माहिती आहे. 

मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल  

दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर पोलीस आणि गटशिक्षणाधिकारी यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर मुख्याध्यापक रोजेकर याची वैद्यकीय चाचणी केली असता ते नशेमध्ये असल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर केंद्र प्रमुखांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात संबंधित मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT