Jalna Bribe Saam tv
महाराष्ट्र

Jalna Bribe: अपघाताच्या गुन्ह्यात जलद तपासासाठी लाचेची मागणी; पोलिस हेड कॉन्स्टेबलला अटक

अपघाताच्या गुन्ह्यात जलद तपासासाठी लाचेची मागणी; पोलिस हेड कॉन्स्टेबलला अटक

लक्ष्मण सोळुंके

जालना : नातवाच्या अपघाताच्या दाखल गुन्ह्यात जलद गतीने तपास करण्यासाठी पाच हजाराच्या लाचेची (Bribe) मागणी करून ती लाच स्विकारण्यास संमती दर्शविली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना पोलिसांना (Police) सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबलला अटक केली. (Live Marathi News)

अच्युतराव गोब्रा पवार सदर पोलिस स्टेशन जालना (रा. योगेशनगर जालना) असे अटक करण्यात आलेल्या हेड कॉन्स्टेबलचे नावं आहे. तक्रारदार यांच्‍या नातवाच्या अपघाताचा गुन्हा सदर बाजार पोलिस स्टेशन जालना (Jalna) येथे दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास पवार यांच्याकडे होता. मात्र तपास लवकर होत नव्‍हता.

लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य

पवार यांनी तक्रारदार यांना गुन्ह्याचा तपास स्ट्राॅग आणि जलद गतीने करण्यासाठी पाच हजार रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पवार यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केलीय या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT