Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : तलवारीने केक कापणे पडले महागात; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

Jalna News : जुना जालना भागातील बालाजी मंदीर येथे रस्त्यावर जीत मेहरा हा वाढदिवस तलवारीने केक कापुन साजरा करत आहे; अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापण्यात आला. जालन्यामध्ये हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. 

जित नंदकिशोर मेहरा आणि रोहित संतोष जाधव असे (Police) पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांची नावं आहेत. जित मेहरा याचा वाढदिवस होता. यामुळे मित्रांकडून वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. जुना (Jalna) जालना भागातील बालाजी मंदीर येथे रस्त्यावर जीत मेहरा हा वाढदिवस तलवारीने केक कापुन साजरा करत आहे; अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी जित मेहरा यास ताब्यात घेतले. 

घरातून तलवार केली जप्त 

दरम्यान सदर वाढदिवसाचा केक कापण्यासाठी वापरलेल्या तलवारीबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्याने ती तलवार रोहित संतोष जाधव या तरुणाकडून आणल्याचे सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी रोहित जाधव यास ताब्यात घेतले. तसेच त्याच्या राहत्या घरातून २ हजार ५०० रुपये किंमतीची धारदार तलवार जप्त केली. या प्रकरणी कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT