Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan: आंदोलकांनी जाळले पंचायत समिती कार्यालय; कागदपत्र जळून खाक

Jalna News : आंदोलकांनी जाळले पंचायत समिती कार्यालय; कागदपत्र जळून खाक

लक्ष्मण सोळुंके

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. ठिकठिकाणी जाळपोडच्या घटना सुरूच आहेत. याच दरम्यान (Jalna News) जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील पंचायत समितीचे कार्यालयच जाळून टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. यात संपूर्ण रेकॉर्ड (Maratha Aarkshan) जाळून गेल्याची माहिती समोर आली आहे. (Tajya Batmya)

मराठा आरक्षणासंदर्भात सरकार अजून कोणताही सकारात्मक निर्णय घेत नाही. यामुळे मराठा समाजाकडून आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. राज्यातील अनेक भागात टायर जाळून रास्ता रोको केले जात आहे. शिवाय वाहनांवर दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. महामंडळाच्या बसचे देखील नुकसान करण्यात आले आहे. याच दरम्यान घनसावंगी येथील पंचायत समितीचे कार्यालयाला पहाटेच्या सुमारास आग लावण्यात आली आहे. 
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कागदपत्र जळून खाक
मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु असताना आज सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात तरुणांनी घनसावंगी पंचायत समितीच्या कार्यालयला आग लावली. या आगीत पंचायत समिती कार्यालयातील सर्व कागदपत्र जळून खाक झाल्याने शासकीय रेकॉडचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT