आदल्या दिवशी केले लग्न; दुसऱ्या दिवशी प्रेयसी म्हणाली लग्न अमान्य, प्रियकराने केले विषप्राशन!
आदल्या दिवशी केले लग्न; दुसऱ्या दिवशी प्रेयसी म्हणाली लग्न अमान्य, प्रियकराने केले विषप्राशन!  SaamTvNews
महाराष्ट्र

आदल्या दिवशी केले लग्न; दुसऱ्या दिवशी प्रेयसी म्हणाली लग्न अमान्य, प्रियकराने केले विषप्राशन!

लक्ष्मण सोळुंके

जालना : जुना जालना शहरातील दीपक राजेंद्र तिळवणे या 23 वर्षीय तरुणाचे परिसरात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणी सोबत प्रेम सबंध होते. दिपकच्या आई वडिलांनी त्याचा विवाह काही दिवसांपूर्वी इतरत्र जमवल्याने, ह्या वीस वर्षीय तरुणीने दिपकचे घर गाठत आपल्यात आणि दीपक मध्ये प्रेम संबंध असल्याने आम्ही एकमेकांना सोडून जागु शकत नसल्याचे सांगत दीपकच्या आई वडिलांना सांगत त्याचा जमलेला विवाह मोडला. दीपकने देखील आपला विवाह या तरुणीसोबत करावा असा आग्रह धरला. घरच्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला.

मात्र, काल दीपक आणि गायत्री यांनी घरच्यांचा विरोध झुगारून हिंदू विवाह पद्धतीने शहरातील एका मंदिरात जाऊन विवाह ही उरकून घेतला. विवाहानंतर गायत्री हिने आपण सज्ञान असल्याचे सांगत आपण स्वतःच्या मर्जीने दीपक सोबत विवाह करत असल्याचा बॉण्ड पेपर वर करारनामा ही लिहून दिला. लग्नानंतर दीपक आणि गायत्री रात्री दिपकच्या घरी गेले. घरच्यांनी दीपकचे लग्न मान्य करत मुलाच्या इच्छापूर्तीसाठी या लग्नास मान्यता देत गायत्रीचा रूढी, प्रथांप्रमाणे विधिवत तिचा स्वीकार ही केला.

मात्र, लग्नाला जेमतेम काही तास होत नाही. तोच गायत्रीच्या नातेवाईकांनी दीपकचे घर गाठत गायत्रीला सोबत घेऊन आम्ही तुमचं आमच्या पद्धतीने पुन्हा सकाळी लग्न लावून देतो सांगत गायत्रीला वाहनात घेऊन गेले. मात्र, आज सकाळी कदीम जालना पोलिसानी दीपक आणि त्यांच्या कुटूंबियांना बोलावून घेत हे लग्न गायत्रीला मान्य नसल्याचे सांगत तिचा नांदण्यास नकार असल्याचे सांगताच दीपक आणि त्यांच्या कुटूंबियांना या संपूर्ण प्रकरणामुळे धक्काच बसला.

आपल्या पत्नीवर दबाव टाकून तिच्या नातेवाईकांनी हा प्रकार घडवून आणल्याचे दिपकने पोलिसांना सांगितले. मात्र, गायत्री सज्ञान असल्याने तिने तिचा निर्णय घेतला असल्याचे सांगताच दीपक ने घर गाठून विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दीपक ने विष प्रश्न केल्याचे कळताच त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जालना हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून त्या ठिकाणी त्यावर उपचार सुरू आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

SCROLL FOR NEXT