SP Shailesh Balkawade And SP Tushar Doshi saam tv
महाराष्ट्र

Jalna Lathi Charge News: शैलेश बलकवडे जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक, लाठीचार्ज प्रकरणी एसपी तुषार दोषींना पाठवले सक्तीच्या रजेवर

Priya More

Jalna SP News:

जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांवर (Maratha Protester) पोलिसांनी (Jalna Police) केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरामध्ये उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं, निदर्षने आणि बंद पुकारण्यात आला आहे.

या लाठीचार्ज प्रकरणी (Jalna Lathi Charge) राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठी कारवाई करत जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक तुषार दोषी (SP Tushar Doshi) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर आता जालना जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश बलकवडे हे जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक झाले आहेत. शैलेश बलकवडे यांनी आज पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज घेतला. जालना जिल्ह्याचे आधीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यामुळे शैलेश बलकवडे हे आता नवीन अधीक्षक झाले आहेत. मराठा आंदोलकांना मारहाण प्रकरणी तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर जिल्ह्यामध्ये दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये ८ पोलिसांसह अनेक आंदोलक देखील जखमी झाले होते. या घटनेनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे नाव पुढे आले होते. त्यानंतर गृहविभागाने त्यांच्याविरोधात सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बुलडाण्यातील सभे दरम्यान यासंदर्भात मोठं वक्तव्य केले होते. त्यांनी सांगितले होते की, 'जालन्याचे एस पी, अतिरिक्त एस पी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चौकशी झाल्यानंतर निलंबन करावं लागलं तर ते ही करू.' त्याचसोबत, 'याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी देखील करू.' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT