Raosaheb Danve on Employment Saam Tv
महाराष्ट्र

Raosaheb Danve on Employment: रोजगाराच्या मुद्द्यावर रावसाहेब दानवे यांचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

रोजगाराच्या मुद्द्यावर रावसाहेब दानवे यांचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raosaheb Danve on Employment: तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगार कसा मिळविता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच एखाद्या औद्योगिक कंपनीत कुठल्याही पदावर काम करत असताना त्या कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जालना येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या व भोकरदन येथील मोरेश्वर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन येथे आज पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, ''उमेदवारांनी सर्व परिस्थितीचा प्रथम अभ्यास करुन रोजगार मेळाव्यातून नोकरी निवडावी. उमेदवाराच्या कौशल्यावर या मेळाव्यातून नोकरी मिळणार असल्याने आपली निवड न झाल्यास खचून न जाता नव्याने पुन्हा तयारीला लागून पुढील रोजगार मेळाव्यात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, आपल्या शहर परिसरातील उद्योग व्यवसायाचा अभ्यास करुन त्या-त्या क्षेत्रातील योग्यतेची पात्रता संपादन करावी. जेणेकरुन आपल्या आवडत्या क्षेत्रात आपल्याला नोकरीची संधी प्राप्त होवू शकेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

ज्या उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त नाही अशा उमेदवारांनी येथे भरविण्यात आलेल्या विविध महामंडळाकडून व्यवसायासाठी मिळणारे कर्ज घेऊन आपला स्वत: व्यवसाय उभारावा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : प्रणित मोरे बिग बॉसच्या घराबाहेर का गेला? नेमका कोणता आजार झाला होता, माहिती आली समोर

Crime News : धाराशीवमध्ये रक्तरंजित थरार! टपरी चालकाची दिवसाढवळ्या हत्या, धक्कादायक कारण

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल.

Kartik Aaryan : इच्छाधारी नागाच्या रुपात कार्तिक आर्यन; नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू, रिलीज डेट काय?

BJP Silent March: विरोधकांचा कट हाणून पाडा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरोधकांच्या मोर्चावर कडाडले, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT