Burnt car used in the staged death plot in Jalna murder case Saam tv
महाराष्ट्र

कर्जातून सुटकेसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव, हत्या करून कारमध्ये मृतदेह पेटवला

Jalna Man Fakes Death For Insurance Kills Victim: कर्जाचा वाढता बोजा पाहून माणूस हतबल होतो. मात्र, कर्जातून सुटण्यासाठी आणि विम्याचे कोट्यवधी रुपये लाटण्यासाठी कुणी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला तर आश्चर्य वाटायला नको. जालन्यात असाच एक प्रकार उघडकीस आलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी एका व्यक्तीनं स्वतःच्याच मृत्यूचा असा काही बनाव केलाय ज्यानं खुद्द पोलीसही चक्रावून गेलेत. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचण्यासाठी एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आरोपी नितीन गवळीनं एकाची हत्या करून स्वत:च्या मृत्यूचा हा सिनेस्टाईल बनाव का रचला ते पाहूयात....

आरोपी नितीन गवळीनं हा सगळा प्रकार विम्याची मोठी रक्कम मिळवण्यासाठी आणि कर्जाच्या विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. या कटासाठी त्याने अमित राजू फुलारे आणि आकाश गवळी या दोघांना सोबत घेऊन संदीप चव्हाण या तरुणाचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचं रुप देण्यासाठी आरोपीनं संदीप चव्हाणचा मृतदेह कारमध्ये ठेवला आणि कार पेटवून दिली.

या घटनेचा छडा लावून पोलिसांनी नितीन गवळी, अमित फुलारे आणि आकाश गवळी या तिघांना बेड्या ठोकल्यात. इतकंच नव्हे तर विम्यावर दावा ठोकण्यासाठी आरोपीनं मृत्यूचा बनाव केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. खरंतर, विम्याच्या पैश्यांसाठी मृत्यूचा बनाव केल्याचा हा काही पहिलाच प्रकार नाहीये. काही महिन्यांपूर्वी लातूरमध्ये 1 कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यात आला होता. मात्र यावेळी स्वत:च्या मृत्यूच्या बनावासह निष्पाप बळीही घेतलाय. त्यामुळे अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशावर घोंघावतंय सर्वात मोठं संकट! 'गॉडझिला'मुळे धडकी भरली, पुढील ३ महिने अत्यंत महत्त्वाचे; नेमका काय दिला इशारा?

डायबिटीजमध्ये नारळ पाणी पिऊ शकता का? नारळ पाणी प्यायल्याने रक्तातील साखर वाढते की कमी होते? जाणून घ्या

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय, आंदोलनापूर्वी ३ प्रवक्त्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Alu Darwaza Rajgad: राजगड आणि तोरणा या किल्ल्यांना जोडणारी डोंगरवाट; तुम्ही पाहिलाय का अळू दरवाजा

मुख्याध्यापक २ दिवस बेपत्ता, मुंबई-आग्रा महामार्गाजवळ दुचाकी सापडली; ७० फूट खोल विहिरीत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT