महाराष्ट्र

Jalna Crime: मनोरुग्ण असलेल्या विधवा महिलेवर अत्याचार, जालन्यातील संतापजनक घटना

Jalna Crime: मानसिक रूग्ण असल्याची संधी साधून अज्ञात नराधमाकडून महिलेवर अत्याचार करण्यात आला.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Crime: जालन्यात मानसिकदृष्टया मनोरुग्ण असलेल्या विधवा महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मनोरुग्ण महिला तीन महिन्याची गरोदर राहिल्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर आला. जालना तालुक्यातील थेरगाव येथील या घटनेने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहे.

मानसिकदृष्टया मनोरुग्ण असलेल्या विधवा महिलेवर तीन महिन्यांपूर्वी बलात्कार झाल्याची घटना जालना तालुक्यातील थेरगावात घडली आहे. ही 35 वर्षीय पीडित महिला गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर परिसरात खबळ उडाली आहे.

पीडित महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. याचा या महिलेला मोठा धक्का बसल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले. मनोरुग्ण झाल्याने ही महिला आपल्या भावाच्या घरी राहते. (Latest Marathi news)

गेल्या दोन महिन्यापासून तिला मासिक पाळी न आल्याने कुटूंबातील महिलांनी तिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेले, तेव्हा ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ती मानसिक रूग्ण असल्याची संधी साधून अज्ञात नराधमाने तिच्यावर अत्याचार केला असावा असा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

पीडित महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसांनी अज्ञात नराधमाविरुद्ध मनोरुग्ण असल्याचा फायदा घेत महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक मोबाईल पथकाच्या सह पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Mumbai : मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; बेकरी मालकाचं भयंकर कृत्य

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT