Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: दिरानेच केला भावजयीवर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी केली अटक

दिरानेच केला भावजयीवर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी केली अटक

लक्ष्मण सोळुंके

जालना : नात्याला काळिमा फासणारी घटना जालन्यातील कोठारा गावात घडली. दिरानेच वहिनीवर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भोकरदन (Police) पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे पीडितेचा पती हा हरवलेला असून तिचा पती हरवल्याची मीसिंग तक्रार भोकरदन (Jalna News) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली. (Live Marathi News)

पीडित महिलेचा पती हरवलेला असल्याने पीडितेचा दिर आणि पुतणी हे दररोज तिला सोबत म्हणून संध्याकाळी झोपण्यासाठी तिच्याकडे येत होते. दरम्‍यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित महिलेच्या दिराने तिच्यावर (Crime News) बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी दिरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संशयीत पोलिसांच्‍या ताब्‍यात

घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून संशयीत आरोपी दिराला अटक केली आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT